बातम्या
मराठी भाषा संवर्धन काळाची गरज प्राचार्य अभयकुमार साळुंखे,
By nisha patil - 2/28/2024 4:06:45 PM
Share This News:
कोल्हापूर दि. 28 : येथील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमीत्याने मराठी विषयाचे प्राध्यापक आणि श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूचे कार्याध्यक्ष मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा सत्कार माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुस्तक, प्रतिष्ठानचे सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
यावेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना "आपली मातृभाषा मराठी टिकली तरच सुसंस्कारी समाज टिकेल, त्यामुळे शाश्वत प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संघटनांमधील तरुणांनी आपल्या पातळीवर त्यादृष्टीने प्रयत्न करावा. तसेच मराठी भाषा संवर्धन काळाची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.तसेच शाश्वत प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. धीरज शिंदे यांनी केली. शाश्वत प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख आणि अध्यक्षीय मनोगत डॉ गुरुदत्त म्हाडगुत यांनी केले. यावेळी आभार संतोष परब यांनी मानले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेचे चेअरमन श्री. हितेंद्र साळुंखे,चित्रपट निर्माते संदिप जाधव तसेच शाश्वत प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन काळाची गरज प्राचार्य अभयकुमार साळुंखे,
|