बातम्या

बगीचा आरक्षणाच्या जागेवरील अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

Neglect of the Municipal Corporation to the encroachment of the garden on the reservation site


By nisha patil - 11/7/2023 4:51:20 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : विनोद शिंगे कोल्हापूर शहरातील बी वॉर्ड मध्ये असणाऱ्या हनुमान नगर परिसरात री स क्रमांक 770 मध्ये महापालिकेचे बगीचा चे आरक्षण आहे मात्र या ठिकाणी माजी नगरसेवकांनी बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून विविध व्यवसाय सुरू केले आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी केलाय त्यामुळे जिल्हाधिकारी तथा प्रशासक राहुल रेखावर यांनी याबाबत संबंधित अधिकारी आणि दोषींवर कारवाई करून या अतिक्रमण हटवावे आणि बगीचा तयार करावा जेणेकरून भागातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना विरूंग यासाठी जागा उपलब्ध होईल अशी मागणी तानाजी जाधव यांनी केली आहे.
 


बगीचा आरक्षणाच्या जागेवरील अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष