बातम्या
नेहरु मेमोरियल'च्या नाव बदलावर शिक्कामोर्तब; द्रौपदी मुर्मूचीं प्रस्तावाला मंजुरी
By nisha patil - 1/9/2023 5:40:09 PM
Share This News:
केंद्र सरकारने दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम लायब्ररीचे नाव बदलून त्याला आता पंतप्रधान मेमोरियल म्युझियम लायब्ररी हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे .या नाव बदलाच्या प्रस्तावाला आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे नेहरु म्युझियम आता पंतप्रधान मेमोरियल म्युझियम म्हणून ओळखले जाणार आहे. सरकारच्या गॅझेटमध्ये याची सूचना देण्यात आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि , ‘नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’ तीन मूर्ती भवन येथे आहे. केंद्राने त्याचे नाव ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’ असे करण्याचा निर्णय मागच्या महिन्यात घेतला होता. केंद्राच्या या निर्णयावरुन काँग्रेसने टीका केली होती. केंद्र सरकार सूड बुद्धीने वागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘एनएमएमएल’च्या विशेष बैठकीमध्ये नाम बदलाचा हा निर्णय घेण्यात आला होता. राजनाथसिंह यांनी या संस्थेच्या नाम बदलाच्या प्रस्तावाचे मनापासून स्वागत केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवेदन सादर करण्यात आले होते. नव्या मेमोरियलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे देशाच्या विकासातील योगदान ठळकपणे मांडले जाणार असल्याचं यात सांगण्यात आलं होतं.
दरम्यान मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली होती.'सरकारने सूडवृत्ती आणि क्षुद्रपणा दाखवला', असं ते म्हणाले होते. 'नवे नाव हे राजकारणाच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला ते कळू शकणार नाही. त्यांचा दृष्टिकोन केवळ एका घराण्याचा वारसा जिवंत ठेवण्यापुरता सिमित आहे. देशाच्या इतर पंतप्रधानांच्या योगदानाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही असं म्हणत भाजपने पलटवार केला होता.
नेहरु मेमोरियल'च्या नाव बदलावर शिक्कामोर्तब; द्रौपदी मुर्मूचीं प्रस्तावाला मंजुरी
|