बातम्या
कोतोलीच्या नेहरू विद्या मंदिर व जुनिअर कॉलेजने ५००० शेणी दान
By nisha patil - 3/29/2024 2:25:40 PM
Share This News:
पन्हाळा : प्रतिनिधी नेहरू विद्या मंदिर व जुनिअर कॉलेज कोतोली ही पन्हाळा पश्चिम भागातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. शालेय अभ्यासक्रमांसोबत विध्यार्थ्यांना समाजिक व पर्यवर्णीय जान निर्माण व्हावी या हेतूने
राष्ट्रीय हरित सेना याविभगमर्फत् पर्यावरण पूरक हेतूनेच कोतोली व् परिसरातील भाचरवाडी आळवे माळवाडी कनेरी करंजफेन येथील विध्यार्थी व पालक यांच्या सहकार्याने होळी लहान; व शेणी व पोळी दान उपक्रमाचे नियोजन केले.
जमा झालेल्या ५००० शेणी पंचगंगा स्मशानभूमीस जमा केल्या व होळी मध्ये जमा झालेल्या पोळ्या गरजू व निराधार लोकांना वाटून सामाजिक बांधिलकी जोपासली.राष्ट्रीय हरित सेनेचे समन्व्यक सुरेश लोहार व उपक्रमशील विज्ञान शिक्षक सुभाष लव्हटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पर्यावरण स्नेही उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सुभाष पाटील बाजीराव फिरिंगे संभाजी पाटील, लक्ष्मी बोरगे, प्रतिभा पाटील, शिवजी कुंभार,इंदुताई खांडेकर, सुव्हर्णा पाटील , पर्यवेक्षक निवृत्ती धंडोरे, मुख्याध्यापक पी एस पोर्लेकर उपस्थित होते.
कोतोलीच्या नेहरू विद्या मंदिर व जुनिअर कॉलेजने ५००० शेणी दान
|