बातम्या
ना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान
By nisha patil - 1/23/2024 4:39:34 PM
Share This News:
आयोध्या : उत्तर प्रदेश आणि अयोध्यासह संपूर्ण देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्ला राम मंदिरात विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभरातील करोडो लोक टीव्हीवरुन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत होते. जनतेतून पैसा गोळा करत उभारण्यात आलेल्या अयोध्या राम मंदिराला लोकांनी भरभरुन दान केलं आहे.
दान कऱणाऱ्यांमध्ये सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांचाही समावेश आहे. मुकेश पटेल यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 11 कोटींचा मुकूट दान केला आहे. मुकूट दान करण्यासाठी मुकेश पटेल प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधीच कुटुंबासहित अयोध्येत दाखल झाले होते. सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांनी आपल्या ग्रीन लॅब डायमंड कंपनीत रामलल्लासाठी सोनं, हिरेजडीत 6 किलो वजनाचा मुकूट तयार केला होता. 11 कोटी किंमतीचा हा मुकूट देण्यासाठी मुकेश पटेल अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधीच अयोध्येत दाखल झाले होते. त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ विश्वस्त मंडळाकडे हा मुकूट सोपवला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय खजिनदार दिनेश भाई नावडिया यांनी सांगितलं की, ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश भाई पटेल यांनी अयोध्येतील जगप्रसिद्ध मंदिरात प्रभू श्रीरामाला काही दागिने दान करण्याचा विचार केला होता. मुकेश पटेल यांनी कुटुंबीय आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सोनं, हिऱ्यांनी सजलेला मुकूट देण्याचा निर्णय घेतला.
मुकूटासाठी 4 किलो सोन्याचा वापर
रामलल्लाच्या मूर्तीसाठी मुकूट तयार करण्याआधी दोन कर्मचाऱ्यांना माप घेण्यासाठी अयोध्येला पाठवण्यात आलं होतं. कंपनीचे कर्मचारी मुकूटासाठी माप घेऊन सूरतला परत आल्यानंतर मुकूट बनवण्याचं काम सुरु कऱण्यात आलं होतं. एकूण 6 किलो वजनाच्या मुकूटमध्ये 4 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. मुकूटात छोट्या मोठ्या आकाराचे हिरे, माणिक, मोती, नीलम असे रत्न लावण्यात आले आहेत. हा मुकूट रामलल्लाच्या डोक्याव ठेवण्यात आला आहे.
ना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान
|