मनोरंजन

अनन्या पांडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Netizens trolled Ananya Pandey


By surekha -
Share This News:



अनन्या पांडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
         बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.  काही दिवसांपूर्वी अनन्या पांडे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. जिथे तिच्या ऑल पिंक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.  यावेळी अनन्याने पिंक कोट आणि सॅम स्टॉकिन्ससोबत पिंक हिल्स परिधान केले होते. पण तिच्या गोल्डन बकेट स्टाइल बॅगनं अनेकांचे लक्ष वेधले. अनन्यानं तिच्या या बॅगसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करत काही नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल केलं.अनन्याच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केअनन्या पांडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोलली, 'दाल तडक्याची बादली' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'त्या पर्सची साइज अनन्याच्या स्ट्रगल एवढीच आहे.'एका युझरनं अनन्याच्या फोटोला कमेंट केली, 'लोटा पार्टी करायला निघाली आहे.'अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून काही नेटकरी अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडत आहेत.अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


Netizens trolled Ananya Pandey