बातम्या
दुधासह हे पदार्थ कधीच खाऊ नका
By nisha patil - 8/15/2023 6:58:38 AM
Share This News:
शरीर हेल्दी ठेवण्यासाठी आपण रोजच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त असलेल्या अनेक पदार्थांचा समावेश करतो. दूध हे देखील हेल्दी डाएटचाच भाग असते. त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, बी-6, डी, के, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, आयोडीन असे अनेक घटन असतात, जे शरीर स्वस्थ राखण्यास मदत करतात.
पण बऱ्याच वेळेसे आपण खाण्यापिण्याशी संबंधित काही अशा चुका (food mistakes) करतो, ज्यामुळे आपल्याला आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
आयुर्वेदानुसार, दूध प्यायल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दुधासह कोणते पदार्थ खाणे टाळावे, ते जाणून घेऊया.
दूध-दही
आयुर्वेदानुसार दूध आणि दही एकत्र कधीच सेवन करू नये. दुधासोबत दही खाणे किंवा दूध प्यायल्यानंतर दही खाणे, हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे पोटाशी संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात किंवा पोटही खराब होऊ शकते.
फळं आणि दूध
दूध आणि आंबट फळेही एकत्र खाऊ नयेत. लिंबूवर्गीय फळे आणि दुधाचे एकत्र सेवन केल्यास उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला दूध प्यायचेच असेल तर फळे खाल्ल्यानंतर साधारण 2 तासांनी ते प्यावे.
दूध आणि गूळ
बऱ्याचदा लोकं दुधात साखरेऐवजी गूळ घालतात. हा एक हेल्दी ऑप्शन आहे पण आयुर्वेदानुसार दुधासह गुळाचे सेवन करणे हे पोटासाठी नुकसानकारक ठरू शकते. यामुळे पोट खराब होण्याची शक्यता उद्भवते.
मासे खाल्ल्यावर दूधाचे सेवन
मासे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, परंतु दूध आणि मासे एकत्र कधीही सेवन करू नये. यामुळे तुम्हाला फूड पॉझनिगं, पोटदुखी इत्यादी पचनाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. याशिवाय त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. याशिवाय नारळ आणि दूध यांचे एकत्र सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
दुधासह हे पदार्थ कधीच खाऊ नका
|