बातम्या
चहासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका, बिघडू शकते तब्येत..
By nisha patil - 8/28/2023 7:25:36 AM
Share This News:
आपल्यापैकी बहुतांश जणांची सकाळ एक कप चहा (tea) पिऊनच होते. चहा हा बऱ्याच लोकांच्या आयुष्यातील महत्वाचा हिस्सा आहे. अनेक लोक चहासोबत काही ना काही खाणं किंवा नाश्ता करणं पसंत करतात.
पण काही पदार्थ असे आहेत जे चहासोबत बिलकूल खाऊ नयेत, कारण त्यामुळे पचनक्रिया बिघडते.
तसेच, चहासोबत त्यांच्या सेवनाने आरोग्याची हानीदेखील होऊ शकते. म्हणूनच चहासोबत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे, अन्यथा तुमच्या आरोग्याला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो.
चहा सोबत हे पदार्थ खाणे टाळा
बिस्किट्स
खूप जास्त साखर आणि मैदा असलेली बिस्किटे चहासोबत कधीच खाऊ नयेत. नाहीतर ती खाल्ल्याने शरीरात जास्त साखर जमा होऊ शकते. ज्यामुळे तुमचे शरीर अधिक इन्सुलिन तयार करू शकते.
लोणचं
चहामध्ये टॅनिन असते आणि लोणच्यामध्ये तेल आणि मीठ जास्त असते. या दोघांचे एकत्र सेवन केलेच तर ते चहासोबत पोटात जमा होऊन पोटात त्रास होतो.
चहा आणि दही
चहामध्ये टॅनिन असतात जे दह्याच्या प्रथिनांशी जोडले जाऊ शकते. हे दोन्ही पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका नाहीतर पचन प्रक्रिया मंद होऊ शकते.
फळं
संत्रं किंवा तर आम्लयुक्त फळे, चहासोबत खाल्ल्यास पोटात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे चहा पिण्याआधी किंवा चहा पिऊन झाल्यावर लगेच ही फळं खाणे टाळावे, नाहीतर पोटात त्रास होऊ शकतो.
जास्त गोड किंवा जास्त तिखट पदार्थ
चहासोबत अती गोड किंवा अती तिखट पदार्थ खाल्ले तरीही आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे गरमागरम चहा पिताना असे पदार्थ खाणे टाळावे.
चहासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका, बिघडू शकते तब्येत..
|