बातम्या

नागपूरमध्ये नूतन आमदारांचा सत्कार सोहळा संपन्न...

New MLA felicitation ceremony completed in Nagpur


By nisha patil - 12/18/2024 10:41:34 PM
Share This News:



नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्या वतीने नूतन आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा "आमदार पदी" निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा देखील "आमदार पदी" निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघ नागपूरचे राज्याध्यक्ष योगेश वागदे, ज्येष्ठ पत्रकार व हिंगोलीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, सरचिटणीस भूषण दडवे, नागपूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, उपाध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, नागपूर जिल्हा सचिव प्रकाश कुंभे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आमदारांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


नागपूरमध्ये नूतन आमदारांचा सत्कार सोहळा संपन्न...