बातम्या

न्यु माँडेल च्या वर्धन रेडेकर चे घवघवीत यश

New Mondales Vardhan Redekers breakthrough


By nisha patil - 9/1/2024 12:53:14 PM
Share This News:



कोल्हापूर : ६७ व्या राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धेमध्ये न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या व ज्युनिअर . कॉलेजच्या वर्धन रेडेकर ने घवघवीत यश संपादन केले आहे . कोल्हापूर, भोपाळ, (मध्यप्रदेश) येथे झालेल्या  ६७ व्या राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धेमध्ये वर्धन सचिन रेडेकर इ. ८ वी यांने १० मीटर ओपन साईट रायफल शुटींग या क्रीडा प्रकारात १४ वर्षाखालील वयोगटात रौप्य पदक व महाराष्ट्र टीमला सुवर्णपदक मिळवून दिले आहे त्याला  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याअध्यक्ष  अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव व प्राचार्या शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन व क्रीडा शिक्षक, शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले.


न्यु माँडेल च्या वर्धन रेडेकर चे घवघवीत यश