बातम्या

नव्या वर्षाचे नवे संकल्प

New Years Resolutions


By nisha patil - 1/1/2024 8:19:15 AM
Share This News:



नव्या वर्षाचे नवे संकल्प

नूतन वर्ष सुरू होण्यासाठी आता बोटावर मोजण्याइतकेच काही तास शिल्लक राहिले आहेत. स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे सुरू होणार्‍या नवीन वर्षाच्या सुरवात होण्यापूर्वीच आम्ही आपल्याला काही टिप्‍स देत आहोत.

धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषांसहीत स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो, की त्याचा आपल्याला तर मन:स्ताप तर होतोच. परंतु, त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो. आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो. परंतु, त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे.

स्वत:साठी वेळ काढा-
घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात 'सॅंडविच' होत असते. त्यामुळे व्यक्तीचा स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. दिवसभरातून किमान 10 ते 15 मिनिटे स्वत:साठी काढून ठेवली पाहिजे. या पंधरा मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता. व्यायाम करून फिट राहू शकता.

सकारात्मक विचार करायला शिका-
एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे, त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे, हा आपला स्वभाव बनून जातो. त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे. आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही, हे ठामपणे ठरविले पाहिजे. अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. अगदी कठिण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात.

स्वत:ची कामे स्वत: करा-
आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वत:मुळेच होतो. कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते. त्यात आपला आद्य शत्रू म्हणजे आळस. आपण किमान स्वत:ची तरी कामे स्वत: केली पाहिजेत. नियोजन आखून कामे उरकली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते.


नव्या वर्षाचे नवे संकल्प