बातम्या

मोदी 9 महाजनसंपर्क अभियानामुळे कोल्हापूर दक्षिण मधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

New consciousness among BJP workers in Kolhapur South due to Modi 9 Mahajan Sampark campaign


By nisha patil - 6/23/2023 7:34:42 PM
Share This News:



मोदी 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अमल महाडिक व भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात भरगच्च कार्यक्रम संपन्न होत आहेत. यामुळे मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे देशभर मोदी9 महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक व शौमिका महाडिक यांनी आजवर संयुक्त मोर्चा संमेलन, आरोग्य शिबिर, टिफिन बैठक, भव्य मोटार सायकल रॅली, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत मेळावा, सोशल मीडिया प्रमुखांचा मेळावा, सामूहिक योगाचे आयोजन, प्रभावशाली सामाजिक संस्था व व्यक्तींची भेट, घर घर संपर्क अभियान इत्यादी भरगच्च कार्यक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. 

मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात केलेली विकासकामे आणि यशस्वीरीत्या राबवलेल्या योजना घराघरापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. तो आता यशस्वी होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचीच परिणती म्हणजे कोल्हापूर दक्षिण मधील भारतीय जनता पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. या उर्जादायी अभियानामुळे कार्यकर्ते नव्या उमेदीने आणि जोशाने कामाला लागले आहेत.

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर देशातील बदललेली परिस्थिती नव मतदारांना आकर्षित करत आहे. देशात कमी झालेला भ्रष्टाचार, निर्माण झालेल्या विविध संधी आणि जगभर देशाची उंचावलेली प्रतिमा यामुळे तरुण वर्गातही भाजपची क्रेझ वाढत आहे. कोल्हापूर दक्षिण मतदार संघात तरुणाईही आता भाजप सोबत असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला मोठा जनाधार मिळेल असेच चित्र आहे.


मोदी 9 महाजनसंपर्क अभियानामुळे कोल्हापूर दक्षिण मधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य