बातम्या

नवीन दोन चाकी नोंदणी मालिका 10 फेब्रुवारीपासून सुरु

New two wheeler registration series starts from February 10


By nisha patil - 5/2/2025 7:26:32 PM
Share This News:



नवीन दोन चाकी नोंदणी मालिका 10 फेब्रुवारीपासून सुरु

कोल्हापूर, दि. 5 : खासगी दोन चाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GW 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत संपणार आहे. त्यानंतर नवीन नोंदणी मालिका MH09-GX सुरु केली जाईल. यासाठी पसंती क्रमांक अर्ज 10 व 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:45 ते 3 वाजेपर्यंत खिडकी क्रमांक 10 वर स्वीकारले जातील.

पसंती क्रमांकासाठी अर्जासोबत मूळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे, जो SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढावा. 11 फेब्रुवारी 2025 रोजी पसंती क्रमांक आणि लिलावातील जादा रकमेच्या याद्या जाहीर केल्या जातील.

लिलाव 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता होईल. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधींनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

अर्जावर मोबाईल नंबर व पत्ता लिहिणे अनिवार्य आहे. नोंदणी क्रमांक राखून ठेवताना संबंधित शुल्क परत करता येणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.


नवीन दोन चाकी नोंदणी मालिका 10 फेब्रुवारीपासून सुरु
Total Views: 34