बातम्या
नवजात बालकांना आधारबेस जन्म दाखला मिळणार : जिल्हाधिकारी येडगे
By nisha patil - 8/1/2025 6:28:13 PM
Share This News:
नवजात बालकांना आधारबेस जन्म दाखला मिळणार : जिल्हाधिकारी येडगे
आता रुग्णालयात नवजात बालकांचे आधार कार्ड काढले जाणार आहे. या नवजात बालकांना आधारबेस जन्म दाखला दिला जाणार असुन जिल्ह्यात त्याची सुरुवात येत्या सात ते आठ दिवसांत होणार आहे.अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगेनीं यंत्रणेला दिल्या आहेत. यामुळे पालकांची मोठी चिंता मिटणार आहे.
रुग्णालयातच आता नवजात बालकांचे आधार कार्ड काढले जाणार आहे. नवजात बालकांना आधारबेस जन्म दाखला दिला जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या सात ते आठ दिवसांत होणार आह. अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व मोठ्या सरकारी रुग्णालयांत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर टपाल विभागाकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना सध्या निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड दिले जाते. यामध्ये केवळ बालकाचे छायाचित्र असते. पाच वर्षे पूर्ण झाली की, आधार कार्डमध्ये केले जातात, त्यावेळी हार्ताच्या दहा बोटांचे ठसे, बुब्बुळाच्या स्कॅनचा बायोमेट्रीक द्यावा लागतो. 66 नवजात बालकांचे आधारकार्ड रुग्णालयातच काढण्याचे टपाल विभाग आणि रुग्णालय प्रशासनालाही बैठक घेऊन सूचना देण्यात आल्यात. यामुळे पालकांची मोठी चिंता मिटणार आहे
नवजात बालकांना आधारबेस जन्म दाखला मिळणार : जिल्हाधिकारी येडगे
|