राजकीय

नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Newly elected MLA Rajesh Kshirsagar met Chief Minister Eknath Shinde


By nisha patil - 11/24/2024 6:45:34 PM
Share This News:



नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट 

मुंबई दि.२४ : कोल्हापूर उत्तरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी महायुतीचे सर्वच आमदार आज खासगी विमानाने मुंबईमध्ये दाखल झाले. नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पुष्पगुच्छ देवून क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागतही केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षीरसागर यांच्या शुभेच्छा स्वीकारून विजयाबद्दल अभिनंदन केले. यासह राजेश क्षीरसागर यांच्या विजयात मोलाचे योगदान दिलेल्या कोल्हापूरवासियांचे आभारही मानले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.


नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
Total Views: 40