बातम्या
नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या
By nisha patil - 1/7/2023 1:15:58 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये एका नवदाम्पत्याने विषप्राशन करत आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. जाधव मळा येथील राज संजय जाधव (वय 23) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20) असे आत्महत्या केलेल्या पती आणि पत्नीची नावे आहेत. त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. गेल्या वर्षी त्यांनी विवाह केला होता. राज, त्यांच्या पत्नी ऋतुजा राज यांचे आई-वडील आणि लहान भाऊ असे एकत्रितपणे राहत होते.
नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या
|