बातम्या

तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये सोनूची भूमिका साकारलेली निधी भानूशाली ही एका नव्या भूमिकेत दिसणार

Nidhi Bhanushali who played the role of Sonu in Taarak Mehta Ka Ooltah Chashma


By nisha patil - 12/6/2024 6:28:48 PM
Share This News:



 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील कलाकारांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिकेतील व्यकतीरेखा साकारणाऱ्या कलाकारांना त्याच नावाने ओळखले जाते, इतकी लोकप्रियता या मालिकेला मिळाली. या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली निधी भानूशाली ही एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.नव्या वेब सीरिजमधून निधी कमबॅक करणार आहे. तिचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. 
 

निधी भानूशाली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिने आता आपल्या आगामी सीरिजचा ट्रेलर पोस्ट केला आहे. 11 जून रोजी निधीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरसोबत तिने ''शाळेच्या दिवसातील आठवणी आणखी खास करण्यासाठी आलीय गर्ल गँग.'' अशी कॅप्शन दिली आहे.


तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये सोनूची भूमिका साकारलेली निधी भानूशाली ही एका नव्या भूमिकेत दिसणार