बातम्या

निगवे दुमाला पंचक्रोशीतून शाहू महाराजांना मताधिक्य देणार : दिलीपसिंह चव्हाण (सरकार)

Nigwe Dumala will give more votes to Shahu Maharaj from Panchkroshi


By nisha patil - 4/4/2024 12:35:23 PM
Share This News:



शिये वार्ताहर श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे.त्यामुळे निगवे दुमाला पंचक्रोशीतून येथील स्वाभिमानी जनता महाराजांना मताधिक्य देणार असल्याचे हिम्मतबहाद्दर दिलीपसिंह चव्हाण सरकार यांनी सांगितले.
 

ते निगवे दुमाला ता करवीर येथे शिये जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी दरम्यान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रणजीत सिंह चव्हाण सरकार व संग्राम सिंह चव्हाण सरकार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सरपंच  रुपाली पाटील होत्या. दिलीप सिंह चव्हाण सरकार, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, माजी जि.प. बाजीराव पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
 

यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना, श्रीमंत शाहू  छत्रपती महाराज म्हणाले ,सध्या महाराष्ट्रासह देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.देशाची वाटचाल सध्या एकाधिकार शाही कडे सुरू आहे. एकाधिकारशाही वाट हुकुमशाहीकडे जाऊ शकते. परिणामी लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या एकाधिकारशाहीच्या   विरोधात एकत्र येण्याची हीच वेळ आहे.
   

याप्रसगी निगवे दुमालातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या वतीने श्री शाहू महाराज छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजाराम साखर कारखान्याचे संचालक डॉ. एम. बी. किडगावकर, मा.जि.प.बी.एच.पाटील, बाजीराव पाटील, पंडित लाड, दिनकर आडसूळ, हंबीरराव वळके, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
 

स्वागत व प्रास्ताविक राजाराम कासार यांनी केले. सचिन चौगले वडणगे  यांनी आभार मानले. 
यावेळी मा.प. सं सदस्य चंद्रकांत पाटील, उपसरपंच संकेत बाडकर व सर्व सदस्य, जय हिंद विकास चे चेअरमन बाळासो शिरोळकर व सर्व संचालक,सचिन देवकुळे सरपंच,भुयेवाडी ,प्रभाकर काशीद शिये,सुरेश पाटील, प्रकाश पाटील, दिलीप यादव, सर्जेराव पाटील, अर्जुन पाटील यांच्यासह शिये जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निगवे दुमाला पंचक्रोशीतून शाहू महाराजांना मताधिक्य देणार : दिलीपसिंह चव्हाण (सरकार)