बातम्या

निखिल बनगे याला उच्च शिक्षणासाठी ८४ लाखाची शिष्यवृत्ती प्राप्त

Nikhil Bange received a scholarship of 84 lakhs for higher education


By nisha patil - 3/9/2023 7:04:56 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधि  केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय  विभागाकडून परदेशातील नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  देण्यात येते.या शिष्यवृत्तीसाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचा मुलगा निखिल बनगे हा पाञ ठरला असून त्याला केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून रुपये ८४ लाख इतकी १०० टक्के शिष्यवृत्ती मिळाली आहे.त्याचीऑस्ट्रेलियाच्या यु.एन. एस.डब्लु. या आंतरराष्ट्रीय  स्तरावर १९ वे मानांकन असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सायन्स या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

निखिल बनगे याचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे दत्ताबाळ विद्या मंदिर , माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी , डिप्लोमा संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे आणि बी टेक  जे.जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज जयसिंगपूर येथे झाले आहे.तसेच परदेशी उच्च शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असलेली पी.टी.ई. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी व संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी महालक्ष्मी ॲकॅडमीचे  प्रा.अभय केळकर यांचे महत्वपूर्ण असे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले.यासाठी जनरल कामगार संघ (इंटक) इचलकरंजीचे  पदाधिकारी आणि माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या माध्यमातून खासदार धैर्यशील माने यांचे विशेष सहकार्य लाभले.


निखिल बनगे याला उच्च शिक्षणासाठी ८४ लाखाची शिष्यवृत्ती प्राप्त