बातम्या
निखिल महाजनला 'गोदावरी'साठी मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
By nisha patil - 8/25/2023 8:01:15 PM
Share This News:
सिनेसृष्टीतील मानाच्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. आघाडीचा सिने-दिग्दर्शक निखिल महाजन याला 'गोदावरी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही 'गोदावरी' सिनेमाला गौरवण्यात आले आहे.
'गोदावरी' हा कौटुंबिक सिनेमा आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असा हा सिनेमा आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. नाशकातील गोदावरी नदी हा या सिनेमाचा मुख्य दुवा आहे. ‘गोदावरी’ नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर उलगडेल.
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला निखिल महाजन यांचा ‘गोदावरी’ हा सिनेमा जिओ सिनेमावर प्रेक्षक मोफत पाहू शकतात. 2021 मध्ये व्हँकुव्हर चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. खिळवून ठेवणारी कथा आणि अप्रतिम अभिनयासाठी या सिनेमाचं खूप कौतुक होत आहे.
निखिल महाजनला 'गोदावरी'साठी मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
|