राजकीय

निळू फुले यांची लेक गार्गी फुले यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

Nilu Phules Lake Gargi Phule s entry into NCP


By nisha patil - 5/30/2023 4:28:56 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार राजकारणात एन्ट्री करत आहेत. आता अभिनेते निळू फुले यांची लेक, अभिनेत्री गार्गी फुले  यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी फुले म्हणाल्या,"खूप दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी आणि विचार आहेत. त्याच विचारसरणीचे माझे बाबा निळू फुले होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते. त्या विचारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस न्याय देईल"
गार्गी फुले पुढे म्हणाल्या,"राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा मला आनंद आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबत वडिलांचे चांगले संबंध आहेत. आता पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येऊन प्रवाहात येईल. आता नुसतं किनाऱ्यावर बसून पाहायचं नाही आहे. मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे. तरुणांना वाटतं राजकारणात यावं आणि बदल व्हावा त्यानुसार माझा सुद्धा प्रयत्न असेल. भविष्यात पक्षाने तिकीट दिलं तर का नाही लढणार?".


निळू फुले यांची लेक गार्गी फुले यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश