बातम्या

निशिगंधा कांबळे बनल्या वाकरे गावातील पहिल्या पोलीस उपनिरीक्षक

Nishigandha Kamble became the first Sub Inspector of Police in Wakre village


By nisha patil - 5/7/2023 7:38:49 PM
Share This News:



निशिगंधा कांबळे बनल्या वाकरे गावातील पहिल्या पोलीस उपनिरीक्षक

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिगे) वाकरे (ता. करवीर) या गावातून पहिल्या पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान निशिगंधा विलास सावंत- कांबळे यांनी मिळवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

निशिगंधा कांबळे यांनी २०२० मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांची या पदासाठी निवड झाली होती. मात्र गेली तीन वर्ष या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता.आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये निशिगंधा कांबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला. वाकरे गावातून त्या पहिल्याच पोलीस उपनिरीक्षक झाल्याने त्यांना पहिल्या उपनिरीक्षक होण्याचा मान मिळाला. त्यांचे पती विलास कांबळे हे भोईसर,पालघर खाजगी कंपनीत पर्यावरण अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. निशिगंधा यांना सासरे भगवान कांबळे, सासू माजी सरपंच बायनाबाई कांबळे, पती विलास कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.


निशिगंधा कांबळे बनल्या वाकरे गावातील पहिल्या पोलीस उपनिरीक्षक