बातम्या
नीता अंबानीच्या आकर्षक लुकने वेधले सर्वांचे लक्ष
By nisha patil - 7/15/2024 7:12:49 PM
Share This News:
नीता अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंतच्या लग्नाच्या शुभ आशीर्वाद समारंभासाठी अतिशय खास लुक निवडला. ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.नीता अंबानींनी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. यांनी हँड क्राफ्टेड जरदोजी लेहेंगा एका खास रत्नजडीत जडलेल्या ब्लाउजसह परिधान केला होता.या ब्लाउजमध्ये पूर्णपणे हाताने भरतकाम केलेले नक्षीकाम आणि पाठीवर शुभ हत्ती होता. त्याशिवाय, बॉर्डरवर भरतकाम केलेले काही श्लोक लिहीले होते. खास म्हणजे या लूकचा फोकस पॉईंट हा त्यांच्या ब्लाउजचा मागचा भाग होता. त्यावर आकाश, ईशा आणि अनंत या मुलांसह वेद, पृथ्वी, कृष्णा आणि आदित्य या नातवंडांची नावे होती.नीता अंबानी यांनी वीरेन भगतने डिझाइन केलेल्या पन्नाच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला.याआधी यांनी मेहंदी फ्लॉन्ट केली होती. तळहातावर राधा-कृष्ण यांची प्रतिमा होती. तर, एक हाताच्या मागील बाजूस अनंत-राधिकाचे नाव लिहिले होते. दुसऱ्या हातावर पती मुकेश अंबानी, मुलगा-सून आकाश-श्लोका, मुलगी जावई ईशा-आनंद यांच्यासह नातवंडांची नावे लिहिली होती.12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले . 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नीता अंबानीच्या आकर्षक लुकने वेधले सर्वांचे लक्ष
|