बातम्या

इंजिनीअरिंग क्लस्टरच्या अध्यक्षपदी नितीनचंद्र दलवाई

Nitin Chandra Dalwai as President of Engineering Cluster


By nisha patil - 7/20/2023 11:22:29 PM
Share This News:



कुंभोज/वार्ताहर(विनोद शिंगे) कोल्हापूर फौंन्ड्री अँण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरच्या अध्यक्षपदी नितीनचंद्र  दलवाई यांची व व्यवस्थापकीय संचालक पदी जेष्ठ उद्योजक सुरेन्द्र जैन यांची निवड करण्यात आली. फौन्ड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरच्या मासिक बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. 
कोल्हापूर फौंन्ड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरवर जिल्ह्यातील पाच औद्योगिक संघटनांचा समावेश आहे. या औद्योगिक संघटनांमधून क्लस्टरच्या मुख्य समितीसाठी आपले प्रतिनिधी पाठवले जातात. त्यानुसार शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक ) कडून जेष्ठ उद्योजक सुरेन्द्र जैन, राजू पाटील व भरत जाधव, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( गोशिमा ) कडून नितीनचंद्र दलवाई, अजित अजरी व दिपक चोरगे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन कडून नितीन वाडीकर व बाबासो कोंडेकर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाऊंड्रीमन ( आयआयएफ ) कडून मिलिंद भावे यांची संचालक म्हणून निवड झाली आहे.  

 

संचालक मंडळाच्या या नवनिर्वाचित सदस्यांनी नितीनचंद्र दलवाई यांची अध्यक्षपदी व जेष्ठ उद्योजक सुरेन्द्र जैन यांची व्यवस्थापकीय संचालक पदी सर्वानुमते निवड  केली.      
विखुरलेल्या उद्योगांना एकत्रित करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने क्लस्टर योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कोल्हापूर फौंन्ड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टर योजनेतून शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींमध्ये प्रती दिवस शंभर टन सॅण्ड रिक्लेम होऊ शकेल असे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प उभारत ते यशस्वीपणे चालविले जात आहेत. भविष्यात क्लस्टर योजनेतून फौंन्ड्री उद्योगाप्रमाणेच इंजिनीअरिंग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सुरेन्द्र जैन यांनी स्पष्ट केले.


इंजिनीअरिंग क्लस्टरच्या अध्यक्षपदी नितीनचंद्र दलवाई