बातम्या

डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन नितीन गडकरींनी दिले स्पष्टीकरण

Nitin Gadkaris explanation regarding diesel engine


By nisha patil - 12/9/2023 7:38:07 PM
Share This News:



डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन नितीन गडकरींनी दिले स्पष्टीकरण 

डिझेल वाहनांची निर्मिती कंपन्यांनी कमी करावी, तसं न केल्यास केंद्राकडूनच डिझेल इंजिनवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी  लावण्यात येईल, असा इशारा नितीन गडकरींनी दिल्याचं वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होत होतं. पण आता स्वतः नितीन गडकरींनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नसल्याचं म्हणत नितीन गडकरींनी ते वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान, नितीन गडकरींचं वृत्त व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही पडल्याचं पाहायला मिळालं होतं. भारतीय शेअर बाजारतील ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड, आयशर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

दिल्लीत पार पडत असलेल्या 63 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री नितीन गडकरींचं एक वक्तव्य सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आलं होतं. जर ऑटोमोबाईल कंपन्यांनी स्वतःहून डिझेल इंजिनचा वापर कमी केला नाही, तर डिझेल इंजिनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटीची शिफारस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना प्रत्यक्ष भेटत आणि पत्र लिहित करणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिल्याचं बोललं जात होतं. तसेच, अतिरिक्त जीएसटी प्रदूषण कराच्या स्वरुपात लावला जाणार असून सोबतच डिझेल वाहनांचं उत्पादन कमी करण्याची उद्योगांना विनंती, तसं न केल्यास केंद्राकडूनच डिझेल इंजिनवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा इशाराही गडकरींनी यावेळी दिल्याचं बोललं जात होतं. परंतु, आपल्या याच व्हायरल होणाऱ्या वक्तव्यावर आता नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे.


डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन नितीन गडकरींनी दिले स्पष्टीकरण