बातम्या

नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार

No Mercy Group Chairman Pushkaraj Rajesh Kshirsagar


By nisha patil - 4/7/2023 8:35:52 PM
Share This News:



नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार

कोल्हापूर दि.०४: सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा वसा यावर्षीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष, युवा नेते कु.पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्याकडून जपला गेला. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण म्हणजे वाढदिवस.. एकीकडे वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे फॅडच झाले असताना, आपल्या आनंदाचा क्षण दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करेल, वाढदिवसाचा हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच, या भावनेतून कोणताही गाजावाजा न करता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष युवा नेते कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांचा २५ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

            राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांचे समाजकार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामजिक कतर्व्य समजून आज नो मर्सी ग्रुप व युवा सेनेच्या वतीने महानगरपालिका मामा भोसले विद्यालय क्र.२७ या शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर, वही, कंपास, पाणी बॉटल अशा दर्जेदार शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कु.पुष्कराज क्षीरसागर यांच्या समाजकार्याचे कौतुक करताना अशा क्षीरसागर यांसारख्या दानशूर कुटुंबीयांमुळे महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी चौगले यांनी केले. यावेळी शाळेतील ५० विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक सौ.वर्षा पाटील, श्री.प्रताप पाटील, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, उपशहरप्रमुख धनाजी कारंडे, सुरेश माने, रुपेश इंगवले, विभागप्रमुख सागर कारंडे, रोहन शिंदे यांच्यासह नो मर्सी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यानंतर नो मर्सी ग्रुपच्या वतीने कदमवाडी येथील माझी शाळा अभिनव बालक मंदिर या शाळेस लहान मुलांची खेळणी प्रदान करण्यात आली. यामध्ये घसरगुंडी, झोकाळा, सी- सॉ, बॉल अशी खेळणी देण्यात आली. यावेळी नो मर्सी ग्रुपचे दिग्विजय साळोखे, रोहित मेळवंकी, राजअहमद सय्यद, सनथ कोळेकर, सोहम पोवार, आदित्य महाजन, तिलकराज पाटील, ऋषिकेश बद्रा आदी उपस्थित होते.

            यानंतर प्रॅक्टीस क्लब फॅन्स आणि टीम शिवालय यांचे वतीने सी.पी.आर चौक येथे गोरगरीब गरजू नागरिकांना कोल्हापूर थाळी मोफत भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी नंदू सुतार, उमेश रेळेकर, संदीप तोडकर, गणेश शिंदे, विनायक गवळी, अक्षय पोवार, सुजय बेंडूगडे, शिवाजी वडाम, अमृत परमणे, निलेश हंकारे, पापा प्रभावळे, कुणाल शिंदे, सौरभ हारुगले आदी उपस्थित होते.      

यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट मुंबई यांचे मार्फत मंजूर झालेल्या निधी धनादेशाचे वाटप शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात आले. यामध्ये दर्शनी वैभव काईगडे रा.शाहूवाडी यांचे नवजात शिशु वरील उपचारासाठी रु.२५ हजार आर्थिक मदत, उज्वला अंकुश शेळके रा.शाहुवाडी यांचे नवजात शिशु वरील उपचारासाठी रु.२५ हजार आर्थिक मदत, शिवानी अमृत जाधव रा.कागल यांचे नवजात शिशु वरील उपचारासाठी रु.२५ हजार आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

            नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शना नुसार कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे युवा सेना अध्यक्ष श्री. ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि युवा नेते कु.पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या नेटक्या संयोजनाने “मैत्री युवा महोत्सव” सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश युवा वर्गास देण्यात येतो. यासह भारतीय संकृतीचे जतन व्हावे, आपली संस्कृती युवा वर्गावर बिंबवावी याकरिता दरवर्षी “पारंपारिक दिवस” साजरा करण्यात येतो. यासह वर्षभर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी कार्यक्रम, अंधशाळेतील विद्यार्थ्याना जेवण, वृद्धाश्रमास फळे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात.

            यानंतर सायंकाळी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे केक कापून युवा नेते कु.पुष्कराज क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, भगिनी मंच अध्यक्षा आणि देवस्थान समितीच्या मा.कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे युवा सेना अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, कु.कृष्णराज क्षीरसागर, कु.आदिराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.    


नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार