बातम्या

करिअरसाठी कोणतेही क्षेत्र लहान-मोठे नसते. श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

No career field is too small  Mrs Suhasinidevi Ghatge


By nisha patil - 9/24/2024 7:54:08 PM
Share This News:



कागल,प्रतिनिधी.करिअरसाठी कोणतेही क्षेत्र लहान-मोठे नसते. तर विद्यार्थ्यांना आवड असलेले क्षेत्रच त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे असते.त्यानुसार पालकही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत हे कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

   येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे श्री.छत्रपती शाहू  सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या७६व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभवेळी त्या बोलत होत्या. 

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि.कागल प्रणीत श्री छत्रपती शाहू कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा घेण्यातआल्या.कागल,मुरगूड,सेनापती कापशी व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रावर पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा  स्वतंत्र गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
    सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे  पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले.
 यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम संजय नरके सौ सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,टी.जी.आवटे,विजय बोंगाळे,प्रशासन अधिकारी एम.व्ही.वेसवीकर आदी उपस्थित होते. 

स्वागत व प्रास्तविक मुख्याध्यापक शिवाजी खोत यांनी केले. मुख्याध्यापिका जे.व्ही.चव्हाण यांनी आभार मानले.


करिअरसाठी कोणतेही क्षेत्र लहान-मोठे नसते. श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे