बातम्या
एकही नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही : प्रकाश आबिटकर
By nisha patil - 6/1/2025 10:22:09 PM
Share This News:
एकही नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही : प्रकाश आबिटकर
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्याचा निर्धार..
"चंदगड तालुक्यातील एकाही नागरिकाला आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागणार नाही," अशी ग्वाही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. येथील नागरिक सत्कार प्रसंगी ते बोलत होते. आबिटकर यांनी पुढील पाच वर्षांत हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, व प्राथमिक उपचार केंद्रे उभारण्याचे आश्वासन दिले. "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलेच आहे, त्यामुळे विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव पाटील होते. खासदार धनंजय महाडिक यांनीही तालुक्याच्या जलसंपन्नतेची स्तुती करत लोकांनी आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही असे सांगितले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार शिवाजी पाटील म्हणाले, "तालुक्यातील काही गावांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची वानवा आहे, परंतु हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू." यावेळी आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
एकही नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही : प्रकाश आबिटकर
|