बातम्या
मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो - मनोज जरांगे पाटील
By nisha patil - 1/25/2024 7:45:22 PM
Share This News:
पुणे: मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर, मनोज जरांगे यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली. कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला.दरम्यान, मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे, पण जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला आहे, आम्ही मुंबईकडे जात आहोत, असं जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत, असंही ते म्हणाले.
आम्ही आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो आहोत. कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे, पण आम्हाला आरक्षण हवं आहे. कुठेही मार्ग निघो म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला आरक्षण मिळणार आहे, मिळाल्यावर गावाकडे जाऊ. आम्हाला तिकडे मुंबईत जाण्याची हौस नाही. पण मराठा समाजाला आरक्षण हवं. दीड दिवसापूर्वी तेच सांगितलं, आठ दिवसापूर्वी तेच सांगितलं. पण तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा काहीही चर्चा करा, पण आम्हाला आरक्षण हवंच आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, आम्ही तोपर्यंत मुंबईकडे जातो. मला विनंती करायची आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे, आम्ही मजा करायला मुंबईला आलो नाही. मुंबईकरांचे आणि आमचेही हाल होऊ नयेत. त्यामुळे तोडगा काढा. माझ्या समाजाच्या वतीने माझी विनंती आहे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघांनी चर्चा करावी, लगेच तोडगा काढावा. जुनं नवं शिष्टमंडळ येतं पण तोडगा निघत नाही. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढून जावं, असं मनोज जरांगे म्हणाले
मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो - मनोज जरांगे पाटील
|