बातम्या
कितीही गुणकारी असला तरी अतिप्रमाणात गुळ खाणे ठरते घातक
By nisha patil - 1/1/2024 8:15:38 AM
Share This News:
हिवाळा सुरू झाल्यानंतर घरातील मोठ्या व्यक्ती गरम पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. कधीकधी गुळ खाण्यासही फायद्याचे असल्याचे सांगितले जाते. पण तुम्हाला माहितीये का गुळ अतिप्रमाणात खाल्ल्याने आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.
मधुमेह असणारे रुग्ण रोजच्या आहारात गुळाचे सेवन करतात. अनेक घरात नॅचरल स्वीटनर म्हणूनही गुळाचा वापर करतात. जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची सवय असल्यासही गुळ खाल्ला जातो. आरोग्यासाठी खूप फायदेशीर असला तरी गुळाचे अतिप्रमाणात सेवन करणे नुकसानीचे ठरु शकते. गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मिनरल्ससारख्या पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत असतो. जे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते. मात्र, त्याव्यतिरिक्त अतिप्रमाणात गुळ खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते.
मधुमेहाचे रुग्ण
गुळात असलेल्या पोषक तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर अतिप्रमाणात गुळ खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. 100 ग्रॅम गुळात जवळपास 10 ते 15 ग्रॅम फ्रुक्टोज असते. अशावेळी रोज गुळाचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरु शकते.
लठ्ठपणा
गुळाचे सेवन नॅचरल स्वीटनर म्हणून करणाऱ्या लोकांनीही हे लक्षात घ्यावे की, अतिप्रमाणात सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते. गुळात प्रोटीनसोबतच फ्रुक्टोजची मात्राही मोठ्या प्रमाणात असते. 100 ग्रॅम गुळात 383 कॅलरीज असतात. त्यामुळं याचे सेवन प्रमाणातच करावे.
पचनसंस्था
प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच पण त्याचबरोबर मेटाबॉलिज्मदेखील मजबूत होते. मात्र, त्याचे सेवन प्रमाणातच करावे. अन्यथा त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होते आणि त्यामुळं बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.
बद्धकोष्ठता
गरजेपेक्षा जास्त गुळाचे सेवन केल्यास फुड अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर, पोटदुखी, सर्दी, खोरला, डोकेदुखी आणि उलटी यारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यां टाळण्यासाठी कधीच गुळाचे अतिप्रमाणात सेवन करु नका.
कितीही गुणकारी असला तरी अतिप्रमाणात गुळ खाणे ठरते घातक
|