बातम्या

आवळा कितीही गुणकारी असला तरी 'या' पाच जणांसाठी ठरेल घातक

No matter how beneficial amla is it will be dangerous for these five people


By nisha patil - 9/9/2023 7:55:35 AM
Share This News:



आवळा हे एक पौष्टिक फळ आहे. यात अनेक औषधी गुणकारी आहेत जे आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. आवळ्यात व्हिटॅमिन सी, अँटी ऑक्सिडेंटसारखे अन्य पोषक तत्वे असतात. ज्यामुळं रोग प्रतिकार शक्ती वाढते, हाडांना बळकटी मिळते, त्वचा निरोगी राहते, तसंच, केसदेखील चमकदार होतात.

आवळ्यात अनेक प्रकारचे कंपाउंट असतात तसंच, त्याचा गुणधर्म हा अॅसिडिक असतो. यात सोडियम व पोटॅशियमची मात्रा अधिक असते. त्यामुळं आवळा काही अंशी नुकसानदायक ठरु शकतो.

आवळा कितीही गुणकारी असला तरी काही लोकांसाठी आवळा खाणे नुकसानदायक ठरु शकते. डॉक्टरही या लोकांना आवळा न खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळं आवळा कोणी खावू नये, हे आजच्या या लेखातून जाणून घेऊया.

अॅसिडिटीने त्रस्त असलेल्या

आवळ्यात व्हिटॅमिनची मात्रा अधिक असते ज्यामुळं अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळं तुम्ही जर अॅसिडिटीपासून त्रस्त आहात तर आवळ्याचे सेवन करणे टाळा किंवा आवळा खाण्यावर नियंत्रण ठेवा.

किडनीचे विकार

जे लोक किडनीच्या विकारांनी त्रस्त आहेत त्यांनी चुकूनही आवळा खाऊ नये. कारण किडणीचे आजार असलेल्या लोकांनी आवळ्याचे सेवन केल्यास शरीरात सोडियमची मात्रा वाढते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

लो ब्लड शुगर

आवळा ब्लड शुगर लेव्हल कमी करते. त्यामुळं तुम्हाला जर आधीपासूनच तुम्ही लो ब्लड शुगरमुळं त्रस्त आहात तर आवळ्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. त्याशिवाय जे लोक अँटी डायबेटिक गोळ्या घेतात त्यांनीही आवळा खाणे टाळले पाहिजे.

गर्भवती व स्तनदा माता

गर्भवती व स्तनदा मातांनी आवळ्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर या महिलांनी आवळ्याचे सेवन केले तर त्यांचे पोट खराब होण्याची शक्यता असता. त्याचबरोबर डिहायड्रेशन सारख्या समस्या गर्भवती महिलांना होऊ शकतात.

ज्यांची शस्त्रक्रिया होणार आहे ते

ज्या लोकांची शस्त्रक्रिया होणार आहे त्यांनीही आवळा खाणे टाळले पाहिजे. आवळ्या खाल्ल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळं शस्त्रक्रिया होण्याच्या २ आठवडे आधी आवळा खाणे टाळावे.


आवळा कितीही गुणकारी असला तरी 'या' पाच जणांसाठी ठरेल घातक