बातम्या

किती ही औषधी असले तरी प्रमाणातच खा कारले

No matter how many medicines there are they ate in moderation


By nisha patil - 9/30/2023 8:20:06 AM
Share This News:



 कारल्याची भाजी नाव ऐकताच काही जण नाक मुरडतात कारण कारले कडू असते. कारल्याची चव कितीही कडू असली करी त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. पौष्टिक गुण असलेल्या कारल्याची भाजी खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात.

मात्र, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कारले खाल्ल्यास त्याचा उलटा परिणामही होऊ शकतो. त्यामुळं कारले प्रमाणातच खावे. अतिप्रमाणात कारले खाल्ल्यास काय होऊ शकते याबाबत प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी माहिती दिली आहे. 
कधी कारले खाऊ नये?

टाइप 1 डायबिटीज

ज्या लोकांना टाइप-1 डायबिटीज आहे,  त्यांनी कारच्याची भाजी किंवा ज्यूसचे सेवन अतिप्रमाणात करु नये. कारण कारल्याचा ज्यूस किंवा भाजी जास्त खाल्ल्यास अचानक ब्लड शुगर झटक्यात खाली येते. यामुळं अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते.

प्रेग्नेंसी

गरोदर महिलांनीही कारल्याची भाजी खाणे टाळले पाहिजे. कारण कारल्यामुळं गर्भाशयाला धोका पोहोचू शकतो तसंच, गर्भातील अभर्काच्या आरोग्यावरही चुकीचा परिणाम होऊ शकतो.

किडनी स्टोन

कारल्यात ऑक्जलेट हे भरपूर प्रमाणात आढळले जाते. त्यामुळं जे लोक कारल्याचे सेवन करतात त्यांना किडनी स्टोन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कारल्यामुळं किडनीमध्ये विषारीतत्व वाढतात.

कारल्यातील कडवटपणा कसा दूर कराल?

कारल्यातील कडवटपणा कमी व्हावा आणि त्यामुळं आरोग्याला अधिक नुकसानही होऊ नये यासाठी कारले योग्य पद्धतीने शिजवण्याची गरज आहे. सगळ्यातपहिले कारलं व्यवस्थित धुवून घ्या त्यानंतर त्यातील बिया काढाव्यात. कारण कारल्याच्या बियांमध्ये जास्त कडवटपणा असतो. कारले बारीक चिरुन घेतल्यानंतर ते मीठाच्या पाण्यातून धुवून काढा जेणेकरुन त्यातील कडवटपणा कमी होईल. त्याचबरोबर कारल्याची भाजी करताना त्यात जास्तीत जास्त कांद्याचा वापर करा. कांद्यामुळं कारल्याजी भाजी कमी कडू होते.


किती ही औषधी असले तरी प्रमाणातच खा कारले