बातम्या
नको पाणी पंचमी.. साजरी करु कोरडी रंगपंचमी - अध्यक्ष राजू दिंडोर्ले
By nisha patil - 3/29/2024 8:01:42 PM
Share This News:
कोल्हापूर :प्रतिनिधी चालू वर्षी महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली होती. यामुळे कोल्हापूर सह महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. कोल्हापूरात रंगपंचमी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. हजारों लिटर पाण्याची नासाडी होत असते. यावर्षी पाणी टंचाई व कडक उन्हाळा हे ओळखून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले लोकप्रिय मा.नगरसेवक मनसे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले व सामाजिक कार्यकर्ते विशाल दिंडोर्ले यांनी कोल्हापूर वाशियांना पाण्यात रंगपंचमी खेळू नये व पाण्याची नासाडी करु नये असा संदेश देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. या त्यांच्या कोरड्या रंगपंचमीला निश्चितच कोल्हापूर ची सुज्ञ जनता दाद देईल याच शंकाच नाही.
शेतकऱ्यांना न्याय देणे असो..गोरगरीब जनतेच्या समस्या असो..कुणावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी मनसेच्या वतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. या अशा सामाजिक कामामुळे निश्चितच मनसेची मान उंचावत चाललेली पहावयास मिळत आहे. दिंडोर्ले परिवाराने कोरड्या रंगपंचमीला तारा न्युज कडून सलाम...
नको पाणी पंचमी.. साजरी करु कोरडी रंगपंचमी - अध्यक्ष राजू दिंडोर्ले
|