बातम्या

राणा दांपत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Nonbailable warrant against Rana couple


By nisha patil - 4/1/2024 7:31:52 PM
Share This News:



शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठणाचा दिखावा करणाऱ्या राणा दांपत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज याआधी न्यायालयानं फेटाळला होता. गुरुवारी त्यांच्याविरोधात आरोपनिश्चिती होणार होती. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीवेळी राणा दांपत्य विशेष सत्र न्यायालयात उपस्थित नव्हते. आपण लोकप्रतिनिधी असून जनतेच्या काही महत्त्वाच्या कामांमुळे आपल्याला न्यायालयात उपस्थित राहता येणार नसल्याचं त्यांनी वकिलांमार्फत कळवलं. मात्र हे ऐकताच न्यायमूर्ती संतापले. त्यांनी कडक शब्दात राणा दांपत्याच्या वकिलाना सुनावले की, राणा दांपत्य पुढल्या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित न राहिल्यास त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल आणि पोलिसांच्या मदतीनं त्यांना न्यायालयासमोर आणण्यात येईल. यामुळे पुढील सुनावणीस उपस्थित न राहिल्यास राणा दांपत्याच्या अडचणीत वाढ होईल

एप्रिल 2022 मध्ये राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठणाचा दिखावा केला होता. त्या कृत्यातून सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली होती. या गुह्यात दोषमुक्त करण्याची विनंती राणा दांपत्याने केली होती. पोलिसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 149 अन्वये बजावली होती. त्या नोटिसीचे पालन केले होते. त्यानंतर ती नोटीस मागे घेण्यात आली होती. त्यामुळे पुढील कारवाई करण्याचा प्रश्न उरत नाही, असा दावा राणा दांपत्याने केला होता. तथापि, हा दावा अमान्य करीत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दांपत्याचा अर्ज मंगळवारी फेटाळला. याचवेळी खटला चालवण्याची कार्यवाही सुरू करीत दोघांना 4 जानेवारीला हजर राहण्याचे सक्त आदेश दिले. त्यामुळे राणा दांपत्याला मोठा झटका बसला होता.


राणा दांपत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट