मनोरंजन

करण जोहर नाही तर सलमान खान होस्ट करणार 'बिग बॉस ओटीटी 2'

Not Karan Johar but Salman Khan to host 'Bigg Boss OTT 2'


By surekha -
Share This News:



करण जोहर नाही तर सलमान खान होस्ट करणार 'बिग बॉस ओटीटी 2'

बिग बॉस ओटीटी' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'बिग बॉस ओटीटी' चा पहिला सिझन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने  होस्ट केला होता. आता लवकरच बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या वेळी हा शो करण जोहर नाही तर अभिनेता सलमान खान  होस्ट करणार आहे.  करण जोहर 'बिग बॉस ओटीटी सिझन 2' होस्ट करणार नाहीये. बिग बॉसचा  सूत्रसंचालक सलमान खान हा बिग बॉस ओटीटी-2  होस्ट करताना दिसणार आहे. त्यामुळे आता सलमानचे चाहते बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन पाहण्यास उत्सुक आहेत. 
  'बिग बॉस ओटीटी 2' जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. हा शो 3 महिने दाखवला जाईल. हा शो टीव्हीऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना बघता येणार आहे.  Voot या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन तुम्ही पाहू शकणार आहात. 'बिग बॉस ओटीटी सिझन 2' चे होस्टिंग सलमान खान करणार असल्यानं त्याचे चाहते आता या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


Not Karan Johar but Salman Khan to host 'Bigg Boss OTT 2'