बातम्या

पाटगाव मधील पाण्याचा थेंबही देणार नाही - पालकमंत्री हसन मुश्रीफ

Not even a drop of water will be given in Patgaon


By nisha patil - 12/26/2023 1:32:23 PM
Share This News:



पाटगाव मधील पाण्याचा थेंबही देणार नाही - पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पाटगाव धरणातील पाण्याचा थेंब देखील कोकणातील प्रकल्पासाठी जाऊ देणार नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून अशीच आपली भूमिका असणार आहे. असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी  सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोकणात उभारण्यात येणाऱ्या अदानी कंपनीच्या प्रकल्पाला आपला विरोध नाही, आडगाव धरणातून पाणी देण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

 पाडगाव धरणातील पाणी कोकणातील अदानी कंपनीच्या प्रकल्पात देण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे ,यासंदर्भात दोन शिस्त मंडळ आपणास भेटले आहेत. त्यांनी पाडगाव धरणातील पाणी आदाने यांच्या प्रकल्पास दिल्यास जर समाधी घेण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे आपण या परिसरातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारणार आहे. वडगाव धरणातील पाण्याला धक्का न लावता कोणतीही प्रकल्प उभा करावा त्याला आमचा विरोध असणार नाही असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
 

विरोधकांनी आरोप करायचे असतात त्याप्रमाणे ते करत आहेत. अडीच महिने झाले आम्ही सत्तेत गेलो आहोत. कमी कालावधीत अनेक चांगले निर्णय घेतले आहे. तरी देखील सरकारवर पॅरेलेस झाल्यासारख कोण करत असेल तर त्याची  पॅरेलेसची व्याख्या समजून घेतली पाहिजे असे पालकमंत्री सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले. प्रोत्साहन पर अनुदान सर्वांना देण्याबाबत हिवाळी अधिवेशनाल घोषणा करण्यात आली आहे काहीतरी कारणामुळे हे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही लवकर हे अनुदान मिळेल असा दावा देखील मुश्रीफ यांनी यावेळी केला.


पाटगाव मधील पाण्याचा थेंबही देणार नाही - पालकमंत्री हसन मुश्रीफ