बातम्या

फक्त इडली डोसा नाही तर, केरळ मधील 'हे' स्ट्रीट फूड देखील लोकप्रिय

Not only Idli Dosa


By nisha patil - 9/2/2024 7:30:10 AM
Share This News:



 केरळ म्हटल्यावर हिरवीगार हिरवळ, सुंदर आणि शांत समुद्रकिनारे या काही प्रतिमा आपल्या मनात आणि डोळ्यासमोर येतात. परंतू या राज्याकडे बऱ्याच गोष्टी देण्यासारख्या आहेत.

तुम्हाला देखील नवीन पदार्थांची चव चाखायला आवडत असेल तर, केरळ याठिकाणी नक्की जा. केरळमध्ये फक्त इडली, डोसा नाही तर, अनेक असे पदार्थ आहेत, जे फार चविष्ट आहेत. केरळ पाककृती मसाले, नारळ आणि स्थानिक पातळीवर उगवलेल्या भाज्यांचा वापर करुन अनेक पदार्थ बनवले जातात. तर आज जाणून घेऊन केरळ येथील 5 लोकप्रिय पदार्थ

केरळ परोटा : एक प्रकारचा जाड आणि फ्लफी फ्लॅटब्रेड प्रकारचा पदार्थ आहे. केरळ परोट्यामध्ये अंड असतं. केरळमधील बहुतेक स्ट्रीट फूड विक्रेते आणि इतर भोजनालये हा सॉफ्ट आणि चवदार परोटा विकतात. केरळ परोटा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. केरळ येथे जाणार असाल तर केरळ परोटा नक्का खाऊन पाहा.

केळी चिप्स: पातळ आणि कुरकुरीत केळ्याच्या चिप्स अनेकांच्या आवडत्या आहेत. केळीच्या चिप्सची उत्कृष्ट चव स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करते. अनेक ठिकाणी केळी चिप्स सहज मिळतात. पण केरळ याठिकाणी जाऊन केळी चिप्स खाण्याची मजा फार वेगळी आहे.

पजम पोरी पकोडे : दक्षिणपूर्व आशिया आणि दक्षिण भारतात हा एक सामान्य पदार्थ आहे. केरळवासीयांचा ही आवडता आणि पारंपरिक आवडता नाश्ता आहे. पजम पोरी पकोडे तयार करण्यासाठी केळी गरम तेलात तळून तयार करतात.

फिश फिंगर्स : केरळ याठिकाणी मासे फार मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. स्थानिक लोकांमध्ये फिश फिंगर्स आवडता पदार्थ आहे. केरळमध्ये फिश फिंगर्स स्रॅक्स म्हणून देखील खातात. फिश फिंगर्स चटणी किंवा अधिक मसाल्यासोबत खाल्ले जाऊ शकतात.

अप्पम देखील प्रचंड चवदार पदार्थ आहे. अप्पम हे केरळ येथील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. आंबवलेले तांदूळ पिठात आणि नारळाच्या दुधाने अप्पम बनवले जाते. अप्पम तुम्ही घरी देखील तयार करु शकता. पण जर तुम्ही केरळ याठिकाणी जायचा विचार करत असाल, तर नक्की अप्पम ट्राय करा.


फक्त इडली डोसा नाही तर, केरळ मधील 'हे' स्ट्रीट फूड देखील लोकप्रिय