बातम्या
नोव्हाक जोकोविचचं 'कमबॅक'! दोन वर्षानंतर पहिला एकेरी सामना जिंकला
By nisha patil - 8/17/2023 6:59:10 PM
Share This News:
ग्रँडस्लॅम चॅम्पियन प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेत पहिला एकेरी सामना जिंकला आहे. यासोबतच सिनसिनाटी ओपन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. एटीपी मास्टर्स स्पर्धेमध्ये जोकोविचने प्रतिस्पर्धीकडून वॉकओव्हर मिळाला. दुखापतीमुळे स्पेनच्या अलेजांद्रो फोकिनाने सामन्यातून माघार घेतली. यावेळी जोकोविचने पहिला सेट 6-4 असा जिंकला होता.
सर्बेरियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने 2021 नंतर अमेरिकेमध्ये पहिला एकेरी सामना जिंकला. स्पॅनियार्डला दुसऱ्या सेटमध्ये मांडीच्या दुखापतीमुळे कोर्ट सोडावे लागले तेव्हा त्याने वेस्टर्न आणि सदर्न ओपनमध्ये अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनाचा पराभव केला. जोकोविचने पहिला सेट 6- 4 ने जिंकला. यानंतर डेव्हिडोविचला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. यामुळे सामना 46 मिनिटांत संपला.
नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी ओपनची तिसरी फेरी गाठली आहे. या एटीपी मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचचा प्रतिस्पर्धी डेव्हिडोविच फोकिना याने माघार घेतली. दुखापतीमुळे डेव्हिडोविचला सामना खेळणे कठीण झालं. यावेळी जोकोविचने पहिला सेट 6-4 असा जिंकला होता. डेव्हिडोविच फोकिनाने सामन्यातून माघार घेतली. यामुळे जोकोविचने सामना जिंकला.
नोव्हाक जोकोविचचं 'कमबॅक'! दोन वर्षानंतर पहिला एकेरी सामना जिंकला
|