बातम्या

आता अंबाबाई भक्तांना मिळणार आरोग्य सेवा

Now Ambabai devotees  health services


By nisha patil - 6/13/2023 4:38:40 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  साडेतीनशक्ती पिठा पैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा मिळावी ,यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मंदिर परिसरात प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये सकाळी सहा ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री दहा अशा दोन शिफ्ट मध्ये एक डॉक्टर एक परिचारिका उपचारासाठी सज्ज राहणार आहेत. त्याचबरोबर सुसज्ज रुग्णवाहिका देखील या वेळेत उपलब्ध राहील. जिल्हा केमिस्ट अँड ड्रेस असोसिएशन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या प्रथमोपचार केंद्रास औषधी आणि वैद्यकीय साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत .या प्रथमोपचार केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुनील देशमुख ,डॉक्टर राम करले, आरोग्य दूध बंटी सावंत मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर देसाई आदी उपस्थित होते.


आता अंबाबाई भक्तांना मिळणार आरोग्य सेवा