बातम्या

आता केएमटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार सातवा वेतन

Now KMT employees will also get seventh salary


By nisha patil - 12/20/2023 6:04:48 PM
Share This News:



कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाने 16 डिसेंबरला राज्य शासनाकडे पाठवला आहे. केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास हरकत नाही अशी शिफारस प्रस्तावात केली आहे.  त्यामुळे आता लवकरच केएमटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 

 महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून केएमटी कर्मचाऱ्यांनी ही वेतन आयोगासाठी पाठपुरावा केला होता त्यासाठी प्रसंगी संप करण्याचा कडक इशारा त्याने प्रशासनाला दिला होता. अखेर केएमटी कर्मचाऱ्यांनी  30 नोव्हेंबर पासून बेमुदत संप करण्यात आला होता. या तीन दिवस बेमुदत संपामुळे प्रवाशांचे  अक्षरशः हाल झाले होते.  अखेर प्रशासनाने लवकर शासनाला प्रस्ताव पाठवण्याची ग्वाही दिल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून संप मागे घेण्यात आला होता.
 

   कोल्हापूर शहर व परिसराची केएमटी म्हणजे लाईफ लाईनच... दररोज 65 बसेस विविध 22 मार्गावरून धावतात त्यातून सुमारे 40 ते 45 हजार प्रवासी प्रवास करत असतात.त्यातून दररोज सुमारे सात ते साडेसात लाख उत्पन्न जमा होते, तसेच रोजच्या सुमारे दीड लाख रुपयाचा तोटा देखील सहन करावा लागतो. ना नफा ना तोटा तत्वावर सुरू असलेली केमटी आर्थिक दृष्ट्या डबगाईतून धावत आहे.  परिणामी केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याला एक कोटी 80 लाख रुपये अनुदान देण्यात येते. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार होतो. केम टीचर पणा मेंटेनन्स आणि इतर देणे भागवण्यातच तो उत्पन्न जात आहे.
 

  के एम टी च्या आस्थापनासाठी एकूण 881 पदांची मंजुरी आहे. मात्र निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत फक्त 379 कायम कर्मचारी आहेत. आता फक्त त्यांनाच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल. गेली अनेक वर्षांपासून केएमटीत कायम कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही त्यामुळे तब्बल 502 पदे रिक्त आहेत. कालांतराने ती पदे भरल्यानंतर ना त्यांनाही सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान केएमटीकडे ड्रायव्हर कंडक्टर नसल्याने ८० ड्रायव्हर आणि 80 कंडक्टर रोजदारींवर घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर वर्कशॉप मध्ये ही आठ रोजगार आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही.


आता केएमटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार सातवा वेतन