बातम्या

आता नेपाळ भारताला वीज निर्यात करणार; भारतानं केला 'हा' मोठा करार

Now Nepal will export electricity to IndiaIndia made this big deal


By nisha patil - 5/1/2024 6:09:21 PM
Share This News:



मुंबई : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे दोन दिवसीय नेपाळच्या  दौऱ्यावर आहेत. या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारानुसार नेपाळमधून भारताला पुढील 10 वर्षांत 10,000 मेगावॅट वीज निर्यात करण्यात येणार आहे. जयशंकर आणि नेपाळचे ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री शक्ती बहादूर बस्नेत यांच्या उपस्थितीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत वीज निर्यात करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी नेपाळचे ऊर्जा सचिव गोपाल सिग्देल आणि त्यांचे भारतीय समकक्ष पंकज अग्रवाल यांनी द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.

हा करार पुढील 10 वर्षांसाठी

पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड  यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान वीज निर्यात करण्याबाबत करार झाली होती. पुष्प कमल दहल हे गेल्या वर्षी 31 मे ते 3 जून या कालावधीत भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी, दोन्ही बाजूंनी शेजारील देशातून नवी दिल्लीची वीज आयात सध्याच्या 450 मेगावॅटवरून पुढील 10 वर्षांत 10,000 मेगावॅटपर्यंत वाढवण्याच्या करारासह अनेक प्रमुख करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सकाळी जयशंकर यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान दहल यांची आपापल्या कार्यालयात भेट घेतली. जयशंकर नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा आणि सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांच्यासह प्रमुख राजकीय नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.


आता नेपाळ भारताला वीज निर्यात करणार; भारतानं केला 'हा' मोठा करार