बातम्या
आता शिवाजी विद्यापीठ देणार साहसी कलांचे प्रशिक्षण ; शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांसह विविध कलांचे समावेश
By neeta - 12/27/2023 2:51:01 PM
Share This News:
कोल्हापूर : रांगड्या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या पारंपारिक साहसीकलांचा वारसा जपण्याचे महत्वपूर्ण काम शिवाजी विद्यापीठाने आपल्या हाती घेतले आहे. या अंतर्गत शिवकालीन युद्ध कला आणि विविध मर्दानी खेळांचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. विद्यापीठाच्या आधी विभाग वस्तीग्रह व सलग्न महाविद्यालयात याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे शिवाजी विद्यापीठ पहिले विद्यापीठ ठरणार आहेत.
सध्याच्या आधुनिक काळात आधुनिक शस्त्रांचा वापर वाढला असला तरी भारतीय प्राचीन युद्धकलाचे महत्व अबाधित आहे. तलवार, विटा ,भाला ,दांडपट्टा, फरी, गजरा, काठी, बंडाठी यासह विविध शस्त्रांचा वापर शिवकाळापासून होत आहे. शिवछत्रपतींचा हा लढवय्या वारसा नव्या पिढीला मिळावा. तसेच या नव्या पिढीला तो कळावा या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने या प्रशासनाची योजना आखली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या नुकताच झालेला आधिसभेत कोल्हापुरातील पारंपारिक शिवकालीन साहसी व मर्दानी खेळांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे, असा ठराव मंजूर झाला आहे. लवकरच कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भातील समिती गठीत होणार आहे. मर्दानी सहाजिक खेळ कोणत्या असावे प्रशिक्षण प्रकार तसेच मुलींसाठी वेगळे प्रशिक्षण देण्याबाबत ठरणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार.
आता शिवाजी विद्यापीठ देणार साहसी कलांचे प्रशिक्षण ; शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांसह विविध कलांचे समावेश
|