बातम्या
"आता चिमुकल्यांच्या स्वप्नांना श्रद्धा इन्स्टिट्यूटचे बळ.. पूर्व प्राथमिक क्षेत्रात श्रद्धा इन्स्टिट्यूट चे दिमाखदार पदार्पण..."
By nisha patil - 6/24/2023 4:47:38 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी इचलकरंजी येथील मेडिकल व आयआयटी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत हजारो डॉक्टर्स व इंजिनियर घडवणाऱ्या श्रद्धा इन्स्टिट्यूटने पूर्व प्राथमिक क्षेत्रात पदार्पण केले. चिमुकल्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा ध्यास घेऊन इचलकरंजी येथील केशे लक्ष्मी मंगल कार्यालय नजीक श्रद्धा सुपर जेम्स व श्रद्धा इन्स्टिट्यूट नजीक श्रद्धा चॅम्प्स असे दोन शैक्षणिक युनिट नव्याने सुरू करण्यात आले.
बदलती शैक्षणिक पद्धती, अभ्यासक्रमाचा स्तर, याचा विचार करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार (N.E.P)व त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आदर्श अभ्यासक्रम देण्याचा आमचा मनापासून प्रयत्न आहे असे उद्गार संस्थेचे चेअरमन श्री. ए.आर तांबे सर यांनी काढले. लहान मुल म्हणजे एक रोपटे असते या रोपट्याला पोषक वातावरण लाभले की, त्याचे वटवृक्षात रुपांतर होते. अशाच पद्धतीने या लहान रोपट्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण बहाल करून त्याचे स्वतःचे अस्तित्व वटवृक्ष प्रमाणे विस्तीर्ण करण्याचा मानस यावेळी तांबे सरांनी बोलून दाखवला.
या दोन युनिट साठी पालकांचा पाल्याच्या प्रवेशासाठी प्रचंड मोठा प्रतिसाद संस्थेला लाभत आहे.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे समन्वयक श्री.एम एस.पाटील सर, सौ सुप्रिया कौदाडे मॅडम, सौ. संगीता पोवार मॅडम, श्री अक्षय सर, श्री. अभिषेक सर, सौ.स्नेहल मॅडम, सौ.सृष्टी मॅडम, सौ वैशाली चव्हाण मॅडम आदी पालक व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी बालचमुंचे चेहरे आनंदाने खुलून गेलेले होते.
"आता चिमुकल्यांच्या स्वप्नांना श्रद्धा इन्स्टिट्यूटचे बळ.. पूर्व प्राथमिक क्षेत्रात श्रद्धा इन्स्टिट्यूट चे दिमाखदार पदार्पण..."
|