बातम्या

आता तर ठाकरेंचं पण ठरलं..!

Now Thackerays decision has also been made


By nisha patil - 3/27/2024 6:28:00 PM
Share This News:



 लोकसभा निवडणुकांचं  बिगुल वाजलं असून राज्यभरात प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षानं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरेंकडून तब्बल 17 उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या लोकसभेत सर्वच पक्षांचं लक्ष मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांकडे  होतं. अशातच महाविकास आघाडीतीलघटक पक्ष असलेला ठाकरे गटानं मुंबईतील सहापैक चार जागांवरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीत चार जागा ठाकरे गटाला सुटल्याचं पाहायला मिळतंय. 
    यंदाची लोकसभा निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांहून वेगळी असणार आहे. याचं कारण म्हणजे, शिवसेनेती अंतर्गत बंडाळी. यामुळे पक्षात उभी फूट पडली. काहीजण शिंदेंसोबत गेले आणि काहीजण ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. त्यामुळे यंदाची लोकसभा अत्यंत चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. मुंबई म्हणजे, शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मुंबई, असं म्हटलं जातं. पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि चित्र बदललं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुंबईत शिवसेना शिंदे गट  विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे


आता तर ठाकरेंचं पण ठरलं..!