बातम्या
आता शनिवारी आणि रविवारीही बँका सुरू
By nisha patil - 3/29/2024 3:26:51 PM
Share This News:
गुड फ्रायडे निमित्त राष्ट्रीयी कृत नागरिक व जिल्हा बँकेचे कामकाज आज शुक्रवारी बंद राहणार आहे. तर शनिवारी व रविवारी बँकेचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवले जावेत यासाठी बँकेचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआय ने दिले आहेत. शनिवारी ग्राहकांना बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. शनिवारी एनइएफटी आणि आरटीजीएस व्यवहार रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहतील तर सरकारी धनादेश क्लिअर करण्यासाठीही रविवारी बँकेचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. सर्व बँका नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील जिल्हा व नागरी बँक आहे शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत शासकीय धनादेश तात्काळ वटवण्याची प्रक्रिया राबवावी असे आदेशात म्हटले आहे.
आता शनिवारी आणि रविवारीही बँका सुरू
|