बातम्या

आता मी मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे

Now even if I die take it to the door of the government


By nisha patil - 2/14/2024 8:13:04 PM
Share This News:



मुंबई - मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील   मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका. सलाईन लावायचं असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता सांगा, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी मांडली आहे. ते अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी बोलत होते. 

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. मी मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका, असेही जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर अन्न आणि पाणीही घेण्यास त्यांनी नकार दिला होता. शिवाय वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिलाय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त पडत असलेला एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


आता मी मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे