बातम्या

आता कोल्हापूरकरांनाही मिळणार आयोध्याच्या रामाचे दर्शन

Now even the people of Kolhapur will get darshan of Rama of Ayodhya


By neeta - 1/24/2024 2:57:30 PM
Share This News:



कोल्हापूर : आयोध्यातील रामललाचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी रेल्वेने कोल्हापूरकरांना उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापूर आयोध्या धाम कोल्हापूर ही अयोध्येला जाणारी विशेष गाडी पुढील महिन्यात 13 फेब्रुवारीला सुटणार आहे. या गाडीचे आरक्षण उद्या सकाळी आठ पासून सुरु होणार आहे.
  कोल्हापूर-आयोध्याधाम - कोल्हापूर ही आयोध्या धाम जाणारी विशेष रेल्वे गाडी क्रमांक 00 148 पुढील महिन्यात मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातून रात्री पावणेदहा वाजता सुटणार आहे. शुक्रवारी 16 फेब्रुवारी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अयोध्या धाम येथून सांगली रेल्वे स्टेशनला परत येणारी गाडी 00149 सुटणार आहे परतीच्या प्रवासात ही गाडी आयोध्या धाम येथून शुक्रवारी 16 फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटेल रविवारी 18 फेब्रुवारीला सकाळी कोल्हापुरात पोहोचेल


आता कोल्हापूरकरांनाही मिळणार आयोध्याच्या रामाचे दर्शन