बातम्या

आता ओव्हरटाईमच...!

Now its overtime


By nisha patil - 11/29/2023 7:39:37 PM
Share This News:



विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रताप्रकरणी  ओव्हरटाईम करावा लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात  अध्यक्षांसमोर सुनावणी घेण्याचे आव्हान आहे. दिवसभर अधिवेशनाचं कामकाज असल्यामुळे त्यांना संध्याकाळी सुनावणी घ्यावी लागणार आहे.  नागपूर  येथे हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सकाळच्या सत्रात  हिवाळी अधिवेशनाचं कामकाज चालणार असल्यामुळे, आमदार अपात्रता प्रकरणात सायंकाळी 4 ते 7 यादरम्यान सुनावणी होऊ शकते. 

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे हिवाळी अधिवेशन आणि दुसरीकडे आमदार अपात्रता सुनावणी  त्यामुळे राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात  तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सगळी साक्ष संपल्यावर निकाल देण्यास 20-25 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून घेण्याची  विनंती केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर ओव्हरटाईम करणार की सर्वोच्च न्यायालयाकडून वेळ मागून घेणार हे पाण्यासारखा असणार आहे.


आता ओव्हरटाईमच...!