बातम्या

एन दिवाळीत आता कांदा शेतकऱ्यांना रडवणार

Now onion farmers will cry in Diwali


By nisha patil - 4/11/2023 8:35:39 PM
Share This News:



आठवड्यांपूर्वी 80 ते 100 रुपयांवर पर्यंत गेलेल्या कांद्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 1250 रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

आता गृहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कांदाच्या दरात घसरण झाली आहे. एन सणासुदीच्या काळामध्ये कांदाच्या दारात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच बजेट कोलमडलेलं होत मात्र कांदाच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
       

गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी उन्हाळी कांद्याला सर्वोच्च दर मिळाला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार 820 रुपये दर मिळाला होता.  बाजारात कांद्याचे दर 80 ते 100 रुपयांवर गेले होते. यामुळे सरकारने कांदा दर नियंत्रण करण्यासाठी नाफेडचे कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.आठवड्याभरात कांद्याच्या दरात तब्बल 1250 रुपयांची घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
       

राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहे. यामुळे केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉक विक्रीसाठी बाजारात आणला. हा कांदा पंचवीस रुपये किलो दराने विक्रीसाठी आणला गेला.  यामुळे आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये दररोज घसरण होत असल्याचं पाहायला मिळतं आहे.


एन दिवाळीत आता कांदा शेतकऱ्यांना रडवणार