बातम्या

आता सांगली-कोल्हापुरातील पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळणार

Now the flood water from Sangli Kolhapur will divert to Marathwada


By nisha patil - 9/1/2024 8:49:02 PM
Share This News:



मुंबई : कोल्हापूर सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत जागतिक बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहे.
   

जागतिक बँकेच्या टीमने 12 सप्टेंबर 2019 रोजी कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर लगेचच फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. त्या सुमारास हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पात जागतिक बँक 280 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 2328 कोटी रुपये राजू सरकार सुमारे 120 मिलियन डॉलर्स म्हणजेच 998 कोटी रुपये योगदान देणार आहे. तीन हजार तीनशे कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. 
   

इकडे तीव्र दुष्काळ, दुसरीकडे महापौर अशी परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे. अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठीशी असतो. अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळतवचून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो. अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती. त्यातून महाराष्ट्र वातावरण पूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रनाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे. पुरेरेषा आखणे ,नदी खोलीकरण, गाळ काढणे ,अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत नीती आयोगाने सुद्धा याबाबत अहवाल दिला होता.


आता सांगली-कोल्हापुरातील पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळणार